Saturday, 5 January 2013

मुंब्य्रात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

|

मुंब्य्रात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

तिघा जणांच्या टोळीने शेअर रिक्षातून जाणा-या एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची छेडछाड केल्याची घटना मुंब्रा बायपास येथे उघडकीस आली आहे.

ठाणे – तिघा जणांच्या टोळीने शेअर रिक्षातून जाणा-या एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची छेडछाड केल्याची घटना मुंब्रा बायपास येथे उघडकीस आली आहे. यावेळी घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकासह चौकडीचा मुंब्रा पोलिस शोध घेत आहेत.
मुंब्रा कौसा येथे राहणारी ही मुलगी दहावीत शिकत आहे. गुरुवारी रात्री ती खासगी शिकवणीवरून घरी जात होती. कौसा कब्रस्तान येथील गेटसमोर असलेल्या पार्क रोडवरून तिने शेअर रिक्षा पकडली. काही अतंर गेल्यानंतर या रिक्षात आणखी तिघे प्रवासी बसले. ही रिक्षा बायपास रोडवर गेल्यानंतर या त्रिकुटाने तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली. तिला धमकावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा या त्रिकुटाचा प्रयत्न होता. तेव्हा घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी घेतली. त्याच वेळी मुंब्रा बायपासवरून मोटारसायकलने जात असलेला एक तरुण हा प्रकार पाहून तिच्या मदतीसाठी धावला. तेव्हा रिक्षाचालकासह चौकडीने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









No comments:

Post a Comment