Saturday, 6 October 2012

मच्छीमार होडीचे नुकसान

तटरक्षक दलाच्या नौकेने ‘निर्मल’ या मासेमारी नौकेला धडक दिल्याने तिच्या पुढच्या बाजूला असलेली फळी मोडली.
देवगड - तटरक्षक दलाच्या नौकेने ‘निर्मल’ या मासेमारी नौकेला धडक दिल्याने तिच्या पुढच्या बाजूला असलेली फळी मोडली. मात्र त्यानंतरही तटरक्षक दलाची नौका कोणतीही चौकशी न करता, निघून गेल्याने मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे. देवगडच्या समुद्रात १७ सागरी मैलांवर हा अपघात घडला. सकाळी दत्तप्रसाद भिल्लारे यांची ‘निर्मल’ ही नौका मासेमारी करत असताना भारतीय तटरक्षक दलाची बोट गस्त घालत होती.
या बोटीने तपासणीसाठी ‘निर्मल’ नौका थांबवण्याची खूण केली. नौकेवरील तांडेलने बोट जवळ आणू नका, अशी विनंती केली. फाइलही खुणेने दाखवली, मात्र तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि बोट ‘निर्मल’ नौकेवर आदळली. भिल्लारे यांनी याबाबत देवगड पोलिस ठाणे, कस्टम व बंदर अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून तटरक्षक दलाने काळजी घ्यावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

Marathi Online News

No comments:

Post a Comment