डोंबिवलीत चोरटयांचा हवेत गोळीबार
शहराच्या पूर्वेकडील सुदर्शननगर येथील सारस्वत कॉलनीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी हवेत गोळीबार करून रोकड आणि ऐवज लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला


डोंबिवली - शहराच्या पूर्वेकडील सुदर्शननगर येथील सारस्वत कॉलनीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी हवेत गोळीबार करून रोकड आणि ऐवज लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, १९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार होण्यात चोरटे यशस्वी ठरले आहेत. मागील दोन वर्षात डोंबिवलीत तीन सशस्त्र दरोडे व चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण आहे.
सारस्वत कॉलनीत राहणा-या रेखा सोलापूरकर या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चार चोरटयांच्या टोळीने बंद घराचे कुलूप तोडून आठ हजारांची रोकड व दागिने, असा एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज पळवला. यावेळी सोसायटीचा सुरक्षारक्षक जगन थापाने चोरटयांना रोखण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षारक्षकांवर हवेत गोळीबार करून चोरटे पसार झाले. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment