Thursday, 20 September 2012

कल्याणमधील देखाव्यावरून वाद

कल्याणमधील देखाव्यावरून वाद

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळाचा देखावा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . पोलिसांचेमनोबलावर भाष्य करणाऱ्या या मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत त्यावर बंदी घातल्याची नोटीसबजावली आहे . मंडळाचे पदाधिकारी मात्र , हा देखावा दाखवण्यावर ठाम असून पोलिसांच्या कारवाईविरोधातहायकोर्टात दाद मागण्याची तयारी मंडळातर्फे केली जात आहे . 

कल्याणमधील रामबाग परिसरात विजय तरुण मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो .दरवर्षी वास्तववादी विषयावर भाष्य करणारे देखावे साकारत असल्याचा मंडळाचा दावा असला तरीपोलिसांकडून त्यावर अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे . दिल्ली मुंबईत घडलेल्या काही हिंसक घटनांचे चित्रणकरीत , त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले असल्याचा निष्कर्ष या देखाव्यातून काढण्यात आला आहे . मात्र यादेखाव्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन शांततेचा भंग होऊ शकतो , असे कारण दाखवत महात्मा फुले चौकपोलिसांनी या देखाव्यावर बंदी घालणारी नोटीस मंडळाचे अध्यक्ष नदीम आगा आणि पदाधिकारी व शिवसेनेचेशहर प्रमुख विजय साळवी यांना बजावली आहे . 

पोलिसांच्या भूमिकेबाबत विजय साळवी यांनी प्रखर नाराजी व्यक्त केली असून त्याविरोधात मुंबई हायकोर्टात दादमागणार असल्याचे त्यांनी सांगितले . या आधीही , सन २००७ मध्ये पोलिसांनी या मंडळाच्या देखाव्यावर बंदीघातली होती . तेव्हाही हायकोर्टातच या प्रकरणावर तोडगा निघू शकला होता . दरम्यान , वादग्रस्त देखाव्यांचीपरंपरा असलेल्या ठाण्यातील आणखी एका मंडळाच्या देखाव्यावरील वादही हायकोर्टात गेला असून , काहीआक्षेपार्ह शब्दांमध्ये फेरबदल करण्याच्या अटीवर या देखाव्याला परवानगी देण्यात आली आहे .

No comments:

Post a Comment